नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद ठेवण्याचा महाविकासआघाडी सरकारचा आदेश

Foto
औरंगाबाद : जगभरात हंगाम घालणारा कोरोना व्हायरस आता भारतात येऊन ठेपला आहे. आतापर्यंत भारतात 81 जणांना कोरोनाची लागण झाल्याची समजले आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस झपाट्याने पसरवू नये यासाठी नागरिकांनी दुरचा प्रवास टाळावा तसेच गर्दीत जाणे टाळावे एकत्रित ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरीमधील शाळांना पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचं त्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आज मध्यरात्रीपासून सर्व निर्णय लागू केले जाणार आहेत. तसेच शालेय परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

महाराष्ट्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार असून मध्यरात्रीपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मॉल, रेस्ट्राँरंट, हॉटेल बंद सुरूच असणार असून नागरिकांनी त्या ठिकाणी जाणे टाळावे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. आपण कोरोना व्हायरसची दक्षता घेतली तर पुढील धोका आपण टाळू शकतो असंही त्यांनी म्हंटल आहे. कोरोनाची उत्पत्ती भारतात झाली नाही त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परिक्षा सोडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा सरकारचा आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबत उगाच भितीचे वातावरण निर्माण होणार नाही यासाठी मुंबईमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला नाही.

त्याचप्रमाणे धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, कार्यक्रमासाठी सरकारकडून परवानगी नाकारण्यात येणार आहे. खासगी कंपऩ्यांबाबत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की खासगी कंपऩ्यांनी शक्यतो कर्मचाऱ्यांना घरी लॅपटॉवर काम करण्याची परवानगी द्यावी रेल्वे आणि बस या सेवा अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे आपण त्या बंद करू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.